Type Here to Get Search Results !

कोरोना : जिल्ह्यात चार लाखांहून अधिक लसीकरण ; 377 केंद्रांवर 2300 कर्मचारी अव्याहतपणे कार्यरतकोरोना : जिल्ह्यात चार लाखांहून अधिक लसीकरण ; 377 केंद्रांवर 2300 कर्मचारी अव्याहतपणे कार्यरत 


सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढता असला तरी त्याला अटकाव करण्यासाठी लसीकरणही मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. जिल्ह्यात आज अखेर सुमारे 4 लाख 20 हजार नागरिकांना लसिकरण करण्यात आले आहे. यासाठी 377 इतक्या लसिकरण केंद्रावर 2300 इतके अधिकारी / कर्मचारी अव्यहतपणे काम करत आहेत.


सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 16 जानेवारी 2021 पासून कोविड -19 चे लसीकरण सुरु करण्यात आले. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर यांचे लसीकरण सुरु करण्यात आले. यानंतर दिनांक 01 फेब्रुवारी 2021 पासून फ्रंटलाईन वर्कर यांचे (महसूल, पोलीस, सफाई कामगार व कोविड मध्ये प्रत्यक्ष काम करणारे) लसीकरण सुरु करण्यात आले. दिनांक 1 मार्च 2021 पासू 60 वर्षावरील व 45 वर्षावरील व्याधीग्रस्त व्यक्ती यांचे लसीकरण सुरु करण्यात आले. तसेच दिनांक 1 एप्रिल 2021 पासू 45 वर्षावरील सर्व व्यक्तींचे लसीकरण करण्यात येत आहे.


सध्या सांगली जिल्ह्यात 377 लसीकरण केंद्रे सुरु असून याठिकाणी जवळपास 2300 वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहय्यक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा तसेच स्वयंसेवक कार्यरत आहेत. आज अखेर 4 लाख 19 हजार 944 लसीकरण करण्यात आलेले आहे. दररोज सरासरी 19 ते 20 हजार लसीकरण होत आहे. 


24X7 वॉर रुम सुरु : आज अखेर 1 हजार 940 कॉल ; गेल्या 10 दिवसापासून दररोज 300 कॉल 

जिल्हा परिषद, सांगली येथे वॉर रुम 24 तास कार्यरत असून कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना व लसीकरणाचे सनियंत्रण येथून केले जाते. तसेच बेड मॅनेजमेंटसाठी वेगळे कॉल सेंटर असून गरजू रुग्णांना बेड उपलब्ध करुन देण्यात येतात. दिनांक 15 फेब्रुवारी 2021 पासून बेड मॅनेजमेंट कॉल सेंटर सुरु असून आज अखेर 1 हजार 940 कॉल आले असून गेल्या 10 दिवसापासून दररोज 300 कॉल येत आहेत. या कॉल सेंटरवर रुग्णांचे नातेवाईक बेड उपलब्धतेसाठी, शंका निरसनासाठी, कोविड 19 बद्दल माहिती इ.साठी फोन करतात.


याबरोबरच गृह अलगीकरण मध्ये असणाऱ्या रुग्णांना आरोग्य सेवा दररोज मिळत असल्याची खात्री करण्यासाठी वेगळी कॉल सेंटर कार्यरत आहे. येथून गृह अलगीकरणामध्ये असणाऱ्या रुग्णांना जिल्हा परिषद मधून दररोज कॉल केला जातो व चौकशी केली जाते. या कॉल सेंटरमध्ये जिल्हा परिषदकडील शिक्षण विभाग, सामान्य प्रशासन विभाग व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.  


जिल्हास्तरीय, महानगरपालिकास्तरीय व तालुकानिहाय कॉलसेंटर्सची यंत्रणा सज्ज

विविध कॉलसेंटर्स दूरध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे - बेड मॅनेजमेट कॉल सेंटर – 0233-2374900, 2375900,2377900,2378900,2378800,2377800 गृह अलगीकरण – 0233-2625700, 2622700, 2623300, 2623500, 2623700, 2620100, 2624500, 2622299, 2375400 महापालिका बेड मॅनेजमेंट कॉल सेंटर – 0233-2375500, 2374500, तालुकास्तरीय कॉल सेंटर – जत – 02344-247229, आटपाडी – 02343-221717, कडेगाव – 02347-295201, खानापूर – 02347-274001, 276056, क. महांकाळ – 02341-222031, पलूस – 02346-228400, तासगाव – 02346-242328, वाळवा – 02342-224475, शिराळा – 02345-221108


या सर्व यंत्रणांचे काम सुरळीतपणे चालावे यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपलिकेचे आयुक्त नितिन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, लसीकरण अधिकारी विवेक पाटील अव्याहतपणे समन्वयाने नियंत्रण करत आहेत.

Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies