Type Here to Get Search Results !

नूतन सभापती सौ.पुष्पाताई जयवंत सरगर यांचा शिक्षक संघाच्यावतीने सत्कार



नूतन सभापती सौ.पुष्पाताई जयवंत सरगर यांचा शिक्षक संघाच्यावतीने सत्कार 


आटपाडी : आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने नवनिर्वाचित सभापती सौ.पुष्पाताई जयवंत सरगर उपसभापती दादासाहेब मरगळे, जननायक, जनसेवक जयवंत (भाऊ) सरगर यांचा आटपाडी पंचायत समितीमध्ये शिक्षक संघाच्या वतीने सत्कार सोहळा जगन्नाथ कोळपे माजी चेअरमन शिक्षक बँक सांगली यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.




यावेळी तालुकाध्यक्ष यशवंत गोडसे यांनी सभापती, उपसभापती यांना शुभेच्छा देत उत्तरोत्तर अनेक मोठी पदे आपणास मिळावीत, आपल्या कार्याचा ठसा आटपाडी तालुक्या मध्ये उमटला जावा, अशा अपेक्षा व्यक्त केली. यावेळी गुरु चे महत्व किती असते, याची प्रचिती आली. नूतन सभापती यांनी आपले प्राथमिक शाळेतील शिक्षक विलास गळवे यांचे पाया पडून आशिर्वाद घेतले. हे दृश्य पाहून सर्वच प्राथमिक शिक्षकांची छाती अभिमानाने भरून आली. यावरून गुरुचे महत्त्व असणारी प्रचिती  सर्वांना अनुभवयास आली.




माजी चेअरमन जगन्नाथ कोळपे यांनी उर्वरित कालावधीमध्ये आपण आपल्या चांगल्या कार्याने आटपाडी तालुक्यामध्ये नावलौकिक मिळवावा. आपला कामाचा ठसा पाहून नेत्यांनी जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी तुमच्या नावाचा विचार करावा. जि.प. सदस्य  किंवा इतर मोठ्या पदाचे तुम्ही हक्कदार व्हावे. कार्य करीत असताना कोणावरही अन्याय होणार नाही. शत्रू सुद्धा आपला मित्र आहे असे समजून कामकाज करण्याचा मोलाचा सल्ला याप्रसंगी दिला. 




आदर्श शिक्षक तालुका नेते अशोक मोटे यांनी तिघांनाही भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा दिल्या. पुष्पा ताईंच्या या यशामध्ये जयवंत भाऊ चा खूप मोठा वाटा आहे. जयवंत भाऊच्या कर्तृत्वामुळे या पदावर आपणांस बसण्याची संधी मिळाली. निंबवडेतील पुष्पाताईनां आटपाडी पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदा सभापती होण्याचा मान मिळाल्याचे अभिमानाने त्यांनी सांगितले. आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी पुष्पाताईंना संधी दिल्यामुळे त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात आले. 




सदर सत्कार सोहळ्यासाठी माजी चेअरमन जगन्नाथ कोळपे, तालुकाध्यक्ष यशवंत गोडसे, तालुका नेते अशोक मोटे, तालुका नेते रमेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष रतिलाल गळवे, जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद देशपांडे, जिल्हाकोषाध्यक्ष मारुती देवडकर, जिल्हा सहचिटणीस सचिन खरमाटे, तालुका उपाध्यक्ष सदाशिव पिंजारी, गणेश  मोटे, सत्यवान मोटे, संघ मार्गदर्शक विलास गळवे, दगडू वाक्षे, हैबतराव ठेंगले, शिक्षक भारतीचे तालुका अध्यक्ष बिरा मुढे, विलास इरकर, आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन शिवाजी लेंगरे, पेन्शन हक्क संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष किरण सोहनी व तालुक्यातील संघाचे मावळे उपस्थित होते. शेवटी आभार शिवाजी लेंगरे यांनी मानले.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies