प्रा.सौ. अनुराधा चेतन जाधव यांचे सेट परीक्षेत यश

प्रा.सौ. अनुराधा चेतन जाधव यांचे सेट परीक्षेत यशप्रा.सौ. अनुराधा चेतन जाधव यांचे सेट परीक्षेत यश 


आटपाडी/बिपीन देशपांडे : श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या प्रा.सौ. अनुराधा चेतन जाधव यांनी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत  (MH SET 2020) घवघवीत यश  संपादन केल्यामुळे  त्यांचे सर्वत्र कौतुक होते आहे. याच कॉलेजमध्ये त्यांचे एम.ए.इंग्रजी पर्यंत शिक्षण झाले असून त्यांनी एम.ए.ला प्रथमवर्ग संपादन केला होता. महाविद्यालयीन  शिक्षण घेत असताना त्यांना शिवाजी विद्यापीठाची मेरिट स्कॉलरशिपही मिळाली होती.


आपल्या या यशाचे सर्व श्रेय त्यांचे सासरे व याच महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक , शिवाजी विद्यापीठाचे गोल्ड मेडलिस्ट प्रा.विश्वनाथ जाधव व पती अॅड. चेतन जाधव यांना दिले आहे. शिवाय दि. आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अमरसिंह देशमुख यांचे वेळोवेळी प्रोत्साहन लाभले आहे. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय लोंढे, इंग्रजी विषयाचे विभागप्रमुख प्रा.डॉ. जयंत कुलकर्णी, प्रा.विजय शिंदे, प्रा. संताजी लोखंडे यांचेही वेळोवेळी अमूल्य मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंद होत आहे.


Join Free Telegram Group माणदेश एक्सप्रेस 


Post a comment

0 Comments