राज्यात आज बाधितांपेक्षा कोरोना मुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढले ; वाचा बातमी सविस्तर

राज्यात आज बाधितांपेक्षा कोरोना मुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढले ; वाचा बातमी सविस्तरराज्यात आज बाधितांपेक्षा कोरोना मुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढले 


आटपाडी : राज्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडाला होता. वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा तोकडी पडल्याने त्याचे मोठे दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला.


दररोज वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे हॉस्पिटल व कोविड सेंटर फुल्ल झाली होती. परंतु आता मात्र दिलासादायक चित्र असून कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली असल्याने काही प्रमाणात आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होण्यास सुरुवात होणार आहे.आज राज्यात 66358 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 67752 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 3669548 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 672434 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.21% झाले आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


Join Free WhatsApp Group माणदेश एक्सप्रेस 


Post a comment

0 Comments