विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना यशवंत गोसावी यांचे खुले पत्र... ; यशवंत गोसावी यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे कोणकोणते प्रश्न विचारले? त्यांच्याबद्दल त्यांचे काय मत आहे? वाचा सविस्तरविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना यशवंत गोसावी यांचे खुले पत्र... ; यशवंत गोसावी यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे कोणकोणते प्रश्न विचारले? त्यांच्याबद्दल त्यांचे काय मत आहे? वाचा सविस्तर 


आटपाडी : किसान युवा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र लिहले असून पत्राद्वारे यांनी त्यांनी भूमिका मांडली असून याद्वारे त्यांनी काही प्रश्न ही देवेंद्र फडणवीस यांना विचारले आहेत. 


जशाचे तसे पत्र 

आदरणीय देवेंद्रजी,

नागपूरच्या नगरसेवकापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंतचा आपला प्रवास अतिशय अभिमानास्पद आहे आणि आज आपण तितक्याच महत्त्वाच्या विरोधी पक्षनेते पदावर आरूढ आहात. पण कोरोनाच्या संकट काळात त्या पदाची आणि राज्याची इभ्रत जाईल अशी वागणूक आपण करू नये ही सर्वसामान्य मराठी माणसाची अपेक्षा आहे.


आज कोरोनाने राज्यातील लाखो लोक त्रस्त असताना, त्यांना लस मिळावी-औषधें मिळावी याकरता प्रयत्न करण्याऐवजी आपण कोरोना लसीच्या नावाखाली जे घाणेरडे राजकारण करताय, ते आपल्यासारख्या माजी मुख्यमंत्र्यांला अजिबात शोभत नाही. केंद्रातील सरकार पाकिस्तान-बांग्लादेशला लस देऊ शकते, पण महाराष्ट्राला लस देण्यात दुजाभाव करतेय हे नागडे सत्य आहे. अशा वेळी स्वतःचे केंद्रातील वजन वापरून तुम्ही महाराष्ट्राला दिलासा द्यायला हवा होता.. पण आपण तर राजकारण करताय.


जिनेव्हामध्ये भारताची भूमिका मांडण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांना पाठवले होते, तर अटलजींनी गुजरातमधल्या भूकंप पुनर्वसनाची जबाबदारी विरोधी पक्षातील शरद पवारांना सोपवली होती. संकटाच्या काळात पक्षभेद विसरून एकत्र येणे ही आपल्या राजकारणाची महान परंपरा आहे आणि त्याची तुम्हाला आठवण करून द्यावी लागतेय, हे दुर्दैवी आहे.


देवेंद्रजी, राज्यातला शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, त्याला कुठूनच दिलासा मिळत नाहीये आणि अशा वेळी त्या शेतकऱ्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडण्याऐवजी आपण 'अंबानीच्या बंगल्यासमोरील गाडी' या विषयावर संपूर्ण अधिवेशन वाया घातले. विजबिलांच्या संदर्भात आपण ठोस भूमिका घेतलीच नाही, कारण मुंबई व परिसराला अंबानी-अदानीच्या कंपन्या वीजपुरवठा करतात.. त्यांना तुम्हाला दुखवायचे नव्हते .. हे खरे आहे का?


"महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नैतिक परंपरा आहे" असे नितीनजी गडकरी कायम म्हणतात, आपण त्या परंपरेला बट्टा लावताय याची जाणीव करून देण्यासाठी हे पत्र लिहिलंय.


नाहीतर "मी पुन्हा येईन" ही तुमची वलग्ना,

तुम्ही 'पुन्हा कधीच येणार नाही' अशीच ठरेल..!

यशवंत गोसावी

अध्यक्ष : किसान युवा क्रांती संघटना


टीप : सदरील पत्र मी महाराष्ट्राचा नागरिक या नात्याने लिहिलंय, त्यामुळे सर्वपक्षीय 'सतरंजीछाप' कार्यकर्त्यांनी इकडे फिरकू नये.


Join Free Telegram Group माणदेश एक्सप्रेस 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured