सावधान! महाराष्ट्रात प्रवेश करताय... "एवढ्या तासाच्या" आतील RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आवश्यकसांगली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासनाकडील दिनांक 12 मे 2021 रोजीच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुढीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.


कोणताही व्यक्ती कोणत्याही माध्यमाद्वारे महाराष्ट्र राज्यात प्रवशे करीत असेल तर त्याच्याजवळ मागील 48 तासातील निगेटिव्ह RTPCR चाचणी अहवाल असणे बंधकारक असेल. दिनांक 18 एप्रिल 2021 व दिनांक 01 मे 2021 रोजीच्या आदेशान्वये देणेत आलेले संवेदनशील उत्पती क्षेत्रासाठीचे प्रतिबंध हे देशातील कोणत्याही भागातून महाराष्ट्रात येणाऱ्या व्यक्तीस लागू राहील. 


मालवाहतूक वाहनामधून दोन व्यक्ती (वाहन चालक व स्वच्छक/मदतनीस) पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवास करणेस प्रतिबंध असेल. जर एखादे माल वाहतूक वाहन हे महाराष्ट्र राज्याबाहेरुन येत असेल तर मालवाहतूक वाहन हे महाराष्ट्र राज्याबाहेरुन येत असेल तर मालवाहतूक वाहनामधून प्रवास करणाऱ्या व्यक्तींकडे राज्यात प्रवेश करतेवेळी मागील 48 तासातील निगेटिव्ह RTPCR चाचणी अहवाल असणे बंधकारक असेल. तसेच सदरचा निगेटिव्ह RTPCR अहवाल हा पुढील 7 दिवसासाठी वैध राहील. सूट देण्यात आलेल्या आस्थापनांनी, शासनाने त्या-त्या विभागासाठी/ आस्थापनांसाठी नेमून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.


या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत. हा आदेश दिनांक 01 जून 2021 रोजीच्या सकाळी 7 वाजेपर्यंत अंमलात राहील. 

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured