Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्याची शान, माधुरी दीक्षित यांचे फॅन...आटपाडी : आटपाडी हा माणदेशातील एक दुष्काळग्रस्त तालुका आहे. या तालुक्यात पाण्याचा दुष्काळ आहे, पण कला, छंद, साहित्य अभिनय,खेळ, विद्वत्ता यांचा मात्र सुकाळ आहे. साहित्यकार, अभिनय, चित्रकला, व्यांग्यकर या सर्वांच्यामुळे, महाराष्ट्रात आटपाडीचा नाव लौकीक झाला आहे. प्रत्येक जण आपला छंद व आवड जीवाच्यापलीकडे जोपासत आहे. अशीच आटपाडीच्या नावलौकिकात एका युवकाने भर घातली आहे. आटपाडीच्या या सुपुत्राचे नाव आहे, ' बिपीन देशपांडे'. बिपीनने आजपर्यंत एक छंद जोपासलेला आहे. तो म्हणजे, "चित्रपटातील कलाकारांना पत्र पाठवणे."


अगदी लहानपणापासूनच शाळेत असताना, हिंदी चित्रपट पाहण्याची आवड व त्यातून आवडत्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला पत्र पाठवून शुभेच्छा देने, हा छंद जडला आहे. त्या पैकीच एक आवडती अभिनेत्री म्हणजे "माधुरी दीक्षित” होय.  माधुरी दीक्षित यांचे सौंदर्य, अभिनय, नृत्य आणि विद्वत्ता या सर्वांच्यामुळे त्यांना त्यांनी आपले आदर्श मानले होते. त्यामुळे ज्या चित्रपटात व कार्यक्रमात माधुरीचा सहभाग असेल, तो  चित्रपट व कार्यक्रम ते न चुकता पाहत असत. त्यांनी माधुरी दीक्षित यांचा  "हम आपके है कौन" हा चित्रपट अतिशय आवडल्यामुळे, अनेक वेळा पाहिला होता. नंतर त्यांनी माधुरी दीक्षित यांना चित्रपट पाठवून, तुमचा “हम आपके है कौन” हा चित्रपट फार आवडल्याचे कळवले होते. 


विशेष बाब म्हणजे, माधुरी दीक्षित यांनी ही, बिपीन देशपांडे यांच्या पत्राची दखल घेऊन, परत आभाराचे पत्र पाठवून कळवले होते की, "तुमच्या सारख्या रसिकांचे पाठबळ व आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यामुळेच आम्ही यशाची उंच शिखर गाठू शकलो.'' अशा पद्धतीने बिपीन देशपांडे यांनी दादा कोंडके, अशोक सराफ, रेणुका शहाणे इत्यादी चित्रपट कलाकारांच्या सहीची अनेक पत्रे संकलित करून ठेवलेली आहे. या सोबतच त्यांनी पत्रकारिता हा छंद ही जोपासलेला आहे.

 

सध्या ते ' माणदेश एक्सप्रेस' या दैनिकाचे पत्रकार म्हणून सेवा करत आहेत. माधुरी दीक्षित यांना एक वेळ भेटण्याची एक इच्छा अपूर्ण राहिली आहे. निश्चितपणे भविष्यात, ती इच्छा ही लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies