समाधान मिसाळ यांचे आंतरराष्ट्रीय न्यूज एजन्सीच्या डिजिटल जर्नालिझम परीक्षेत यशमाळशिरस/विष्णू भोंगळे : जगातील सर्वात मोठी मानली जाणाऱ्या रॉयटर्स न्यूज एजन्सी च्या पत्रकारिता परीक्षेत माळशिरस तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील कण्हेर येथील समाधान विलास मिसाळ यांनी यश मिळवले आहे. ही आंतरराष्ट्रीय संस्था डिजिटल न्यूज रिपोर्ट ऑक्सफोर्ड विद्यापीठातील रॉयटर्स इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ जर्नलिझमचे संशोधन प्रकाशन आहे.


या संस्थेचे बीबीसी न्यूज, गूगल, ऑफकॉम, आयर्लंडचे ब्रॉडकास्टिंग अथॉरिटी, डच मीडिया ऑथॉरिटी (सीव्हीडीएम), फिनलँडची मीडिया इंडस्ट्री रिसर्च फाउंडेशन, नॉर्वेमधील फ्रिट ऑर्ड फाउंडेशन, कोरिया प्रेस फाउंडेशन, एडलमन यूके, तसेच हंस ब्रेडो इन्स्टिट्यूट, नवर्रा युनिव्हर्सिटी, कॅनबेरा युनिव्हर्सिटी, सेंटर डी ऑट्युड्स सूर लेस माडिया, क्युबेक, कॅनडा आणि डेन्मार्कमधील रोस्किल्डे विद्यापीठातील  प्रायोजक आहेत.


अशा या आंतरराष्ट्रीय संस्थेचा रॉयटर्स डिजिटल जर्नालिझम  या कोर्समध्ये सहभागी होऊन तो पूर्ण केल्यानंतर घेण्यात आलेल्या परीक्षेत समाधान मिसाळ यांनी यश संपादन केले आहे.यांच्या या यशाबद्दल त्यांचे विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.

 Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेसPost a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured