नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असलेल्या राज्यांमध्ये लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली आहे.
देशात गेल्या २४ तासांत ५२,२५६ नवीन कोरोना रुग्ण सापडले. तर ७७,१९० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत देखील घट होतं असल्याचं दिलासादायक चित्र आहे. देशात गेल्या २४ तासांत १४२२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन आढळलेल्या बाधितांची संख्या ८८ दिवसांपासून सर्वाधिक कमी आहे.