आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये बाधित रुग्ण प्रमाण वाढले होते. परंतु लॉकडाऊन केल्या नंतर मात्र रुग्ण संख्येला आळा बसला होता. रुग्ण संख्येला आळा बसल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. आज दिनांक २१ रोजी कोरोनाचे २० नवे रुग्ण आढळून आले आहेत.
बाधित रूग्णामध्ये आटपाडी ०४, उंबरगाव ०१, कुरणवाडी ता. माण ०३, गोमेवाडी ०२, खरसुंडी ०२, घाणंद ०१, गळवेवाडी ०१, कौठूळी ०१, बेरगळवाडी ०१, शेटफळे ०४ या गावातील रुग्णाचा समावेश आहे.
आज आलेल्या कोरोना बाधित रूग्णापैकी पुरुष रुग्ण ०७ तर स्त्री १३ असे एकूण २० नवे रुग्ण कोरोना बाधित आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.