Type Here to Get Search Results !

कोविड रूग्णांची संख्या घटल्याने सांगली जिल्ह्यातील या 33 रूग्णालयांतील कोविड रूग्णसेवा बंद :प्रशासनाकडून व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरविले असल्यास परत करण्याचे आदेशसांगली : ज्या कोविड रूग्णालयांमध्ये (डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल (DCH), डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (DCHC)) कोविड रूग्णांची संख्या कमी आहे, अशी रूग्णालये बंद  करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. कोविड रूग्ण सद्यस्थिती पाहता व संभाव्य कोविडच्या तिसऱ्या लाटेमधील रूग्णांची संख्या वाढल्याचे आढळल्यास बंद करण्यात आलेली रूग्णालये पुन:श्च कोविड रूग्णालये म्हणून कार्यान्वीत करण्यात येतील, या अटीस अधिन राहून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील एकूण 33 रूग्णालयांना कोविड रूग्णसेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

कोविड रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रूग्णांवर उपचार करण्यासाठी काही रूग्णालये कोविड रूग्णालये म्हणून घोषीत व कार्यान्वीत करण्यात आलेली होती. सद्यस्थितीत कोविड रूग्णांची संख्या कमी होत आहे व रूग्णांसाठी उपलब्ध खाटांची संख्या आवश्यक प्रमाणात शिल्लक राहत आहे. या पार्श्वभूमीवर कोविड रूग्णांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यातील 33 रूग्णालयांना कोविड रूग्णसेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या रूग्णालयात नविन रूग्ण दाखल करून घेवू नयेत व सद्यस्थितीत रूग्णालयात दाखल रूग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर रूग्णालयातील फॅसिलीटी ॲपवरील सर्व माहिती अद्ययावत करावी, प्रशासनाकडून व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरविले असल्यास ते परत करावेत, विहीत पध्दतीने रूग्णालयातील अंतर्गत व बाह्य स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करणे इत्यादी बाबींची पुर्तता करूनच रूग्णालयातील कोविड रूग्णसेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ज्या रूग्णालयांना कोविड रूग्णसेवा बंद करण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहेत ती रूग्णालये पुढीलप्रमाणे – (1) उमा चॅरिटेबल हॉस्पिटल जत (DCH) (2) कोविड-19 हॉस्पीटल तासगाव (DCH) (3) सद्गुरू हॉस्पीटल विटा (DCH) (4) स्वस्तिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल शिराळा (DCH) (5) श्रीनाथ डीसीएससी आटपाडी (DCHC) (6) नुतन डीसीएचसी कवठेमहांकाळ (DCHC) (7) स्पंदन डीसीएचसी कडेगाव (DCHC) (8) मनमंदिर डीसीएचसी विटा (DCHC) (9) जिवनधारा हॉस्पीटल विटा (DCHC) (10) मातोश्री डीसीएचसी खानापूर (DCHC) (11) श्रीछत्रपती शिवाजीराजे डीसीएचसी आळसंद ता. खानापूर (DCHC) (12) वेध हॉस्पीटल डीसीएचसी तासगाव (DCHC) (13) पार्वती डीसीएचसी तासगाव (DCHC) (14) सदिच्छा कोविड डीसीएचसी आष्टा (DCHC) (15) ख्वाजा गरीब नवाज डीसीएचसी इस्लामपूर (DCHC) (16) मातोश्री डीसीएचसी कासेगांव ता. वाळवा (DCHC) (17) सहारा कोविड हॉस्पीटल इस्लामपूर (DCHC) (18) शिवगंगा डीसीएचसी पाटगांव ता. मिरज (DCHC) (19) डॉ. रविंद्र वाळवेकर हॉस्पीटल सांगली (20)  डॉ. महेश दुधणकर हॉस्पीटल सांगली (21) संजिवनी मल्टीकेअर हॉस्पीटल एलएलपी कुपवाड (22) डॉ. शरद घाटगे, घाटगे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल सांगली (23) सायना क्लिनिक ॲण्ड हेल्थ सेंटर सांगली (24) डॉ. दिपक शिखरे, लाईफ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल सांगली (25) डॉ. विठ्ठल माळी, नोबल डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर मिरज (26) डॉ. अनिल मडके, श्वास हॉस्पीटल सांगली (27) भगवान महाविर कोविड केअर सेंटर सांगली (28) डॉ. कपिल उपाध्ये, त्रिशला हॉस्पीटल सांगली (29) डॉ. सुरेश पाटील, हेल्थ पॉईंट मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल मिरज (30) डॉ. तुषार पिड्डे, शिवकृपा डेडिकेटेड कोविड केअर हॉस्पीटल मिरज (31) न्यु लाईफ कोविड केअर सेंटर सांगली (32) नमराह कोविड सेंटर सांगली (33) डॉ. बसंत बुर्ले, संस्कृती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies