एपीएल शिधापत्रिकाधारकांनी सवलतीच्या दरातील अन्नधान्याचा लाभ घ्यावा : जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे

एपीएल शिधापत्रिकाधारकांनी सवलतीच्या दरातील अन्नधान्याचा लाभ घ्यावा : जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवेसांगली :  सन 2020 मध्ये एपीएल (केशरी) योजनेचे धान्य वाटप करून काही गोदामांमध्ये व रास्तभाव दुकानांमध्ये काही प्रमाणात शिल्लक आहे. शासनाच्या निर्देशानुसार शासकीय गोदामांमध्ये तसेच रास्त भाव दुकानांमध्ये शिल्लक असलेल्या एपीएल केशरी सवलतीच्या दराचे गहू व तांदूळ राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती 1 किलो गहू व 1 किलो तांदूळ याप्रमाणे 2 किलो अन्नधान्य माहे जून 2021 करिता सवलतीच्या दराने (गहू 8 रूपये प्रतिकिलो व तांदूळ 12 रूपये प्रतिकिलो) वितरीत करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ एपीएल शिधापत्रिकाधारकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी केले आहे.


कोरोना-19 च्या पार्श्वभूमीवर माहे मे, जून व जुलै 2020 या कालावधीमध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट होवू न शकलेल्या व ज्यांचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे, अशा एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने गहू व तांदूळ वितरीत करण्यात आला आहे. सद्यस्थितीत शासकीय गोदामांमध्ये तसेच रास्त्ा भाव दुकानांमध्ये काही प्रमाणात शिल्लक असलेल्या धान्याचे वाटप उर्वरीत केशरी शिधापत्रिकाधारकांना जून 2021 मध्ये रास्त भाव दुकानांतून करण्यात येत आहे. रास्त भाव दुकानदारांनी प्रथम मागणी करणाऱ्या लाभार्थ्यास (First Come First Served) या तत्वानुसार धान्याचे वितरण करावयाचे आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी स्पष्ट केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

0 Comments