Type Here to Get Search Results !

बोंबेवाडी येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीस गळा दाबून मारहाण



आटपाडी : आटपाडी तालुक्यातील बोंबेवाडी येथे एका व्यक्तीने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीस गळा दाबून जीव मारण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे.


पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार बोंबेवाडी येथील सचिन दुर्योधन चंदनशिवे हा पत्नी मैना हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे दोघांच्यात सतत वादविवाद होत असायचे. दिनांक ८ जून, २०२१ रोजी दुपारी बारा वाजता बोंबेवाडी येथील संजय जाधव यांच्या शेतात मैना शेतमजुरी करण्यासाठी गेल्या असताना तेथे जाऊन त्यांना मारहाण केली. तसेच गळा दाबून जीव मारण्याचा प्रयत्न केला आहे.


जखमी मैना सचिन चंदनशिवे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मैना हिचा भाऊ दत्तात्रय किसन खरात बोंबेवाडी याने सचिन दुर्योधन चंदनशिवे याच्या विरोधात आटपाडी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन दुर्योधन चंदनशिवे याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास फौजदार ए. ए. पाटील करीत आहेत.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies