Type Here to Get Search Results !

पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न



बुलढाणा : अन्यायाच्या विरोधात दाद मागण्यासाठी पोलीस स्टेशनच्या समोर आमरण उपोषणास बसलेल्या बाप-लेकिनचे उपोषण उधळून लावून, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्यामुळे उपोषण कर्त्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उपोषण कर्त्या व्यक्तीला बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.


मिळालेल्या माहितीवरून, बुलढाणा जिल्ह्यातील, चिखली तालुक्यात, अमडापूर येथे सदर घटना घडली आहे. या संदर्भात उपोषण कर्त्याचा भाऊ, गजानन राऊत याने संबंधित पोलिस आरोपींच्या विरोधात तक्रार दिली आहे. उपोषण करते, श्याम राऊत यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांच्याकडे एक तक्रार दिली होती. मात्र त्यावर पोलिसांनी कारवाई केली नाही. यासंदर्भात त्यांनी पोलिसांशी विचारणा केली होती. मात्र त्यावेळी काही पोलीस कर्मचार्यामनी त्यांना पोलीस ठाण्यातच मारहाण केली होती. त्यानंतर त्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांच्याकडे याविषयी तक्रार केली.


श्याम राऊत यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांच्या विरोधात कारवाई करावी, म्हणून श्याम राऊत व त्यांच्या मुलीने काल अमडापूर येथे उपोषण सुरू केले होते. त्यावेळी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी येऊन त्यांना दमदाटी केली व उपोषण उधळून लावले. तसेच श्याम राऊत व त्याच्या नातेवाईकांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे चिंतेत पडलेल्या शाम राऊत यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी तक्रार त्यांचे भाऊ, गजानन राऊत यांनी दिली आहे. सदर घटनेमुळे महाराष्ट्रात लोकशाहीचे राज्य आहे की पोलिसांच्या गुंडशाहीचे राज्य आहे? हा प्रश्न राज्यातील जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. (सोर्स-महाराष्ट्र अपडेट)

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies