Type Here to Get Search Results !

सांगली जिल्ह्यात हॉटेल, बार,रेस्टॉरंटसाठी च्या आदेशात बदल ; नवा आदेश काय आहे?सांगली : राज्य शासनाकडील आरोग्य विभागाकडून निर्गमित केलेल्या दि. 3 जून 2021 रोजी संपणाऱ्या आठवड्याच्या कोव्हीड पॉझिटीव्हीटी दरानुसार राज्य शासनाकडील आदेशान्वये राज्यातील जिल्ह्यांना 1 ते 5 स्तर (Level) मध्ये विभागले आहे. राज्य शासनाकडील आदेशानुसार सांगली जिल्हा स्तर 4  मध्ये मोडत असल्याने, स्तर 4 साठी निर्धारित केलेले प्रतिबंध सांगली जिल्ह्यात दि. ६ जून रोजीच्या आदेशान्वये लागू केले आहेत. 


या आदेशातील मुद्दा क्र. 5 मधील (क) ii मध्ये बदल करण्यात आले असून हॉटेल, रेस्टॉरंट साठी पार्सल सेवा / घेवून जाणे सेवा (Take Away) व घरपोच सेवा (Home Delivery) सुरू राहतील. बार साठी फक्त घरपोच सेवा सुरू राहील, असे सुधारीत आदेश जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies