“मुख्यमंत्री म्हणतात, विरोधात लढले, तर लोक जोड्याने मारतील… खरयं, लोकांनी तुमच्यासाठी जोडे तयार ठेवलेत”

 मुंबई : शिवसेनेच्या ५५वा वर्धापन दिन शनिवारी झाला. यानिमित्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसैनिकांना संबोधित केलं. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष काँग्रेस वारंवार निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करीत असून, राजकीय पक्ष स्वबळाची भाषा करत राहिले, तर लोक जोड्याने मारतील असे उद्धव ठाकरे म्हणाले होते, तसेच सत्ताप्राप्तीसाठी आतुर विरोधकांवरही त्यांनी निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

 “एकमेकांशी लढून, गरळ ओकून, सत्तेसाठी एकत्र आलेल्यांच्या गळ्यात लोक काय हारतुरे घालणार आहेत? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधात लढले, तर लोक जोड्याने मारतील… भीती खरीये. लोकांनी तुमच्यासाठी जोडे तयार ठेवलेत. फक्त निवडणुकांची प्रतीक्षा आहे,” अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured