काँग्रेसला गळती सुरु ; उत्तर प्रदेशमधील या बड्या नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसला गळती सुरु ; उत्तर प्रदेशमधील या बड्या नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेशनवी दिल्ली : उत्तर प्रदेश मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये गळती सुरु  झाली असून उत्तर प्रदेशमधील जितीन प्रसाद या बड्या नेत्याने केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या प्रमुख  उपस्थितीत दिल्ली येथील भाजपा मुख्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला.


 

यावेळी बोलताना ते म्हणाले, माझे घराणे हे तीन पिढ्यांपासून काँग्रेसशी जोडलेले होते. यामुळे काँग्रेस सोडताना मी बराच काळ विचार केला. गेल्या 8-10 वर्षांपासून मला एकच पक्ष खरा राष्ट्रीय वाटत होता, तो म्हणजे भाजपा. बाकी सारे पक्ष हे स्थानिक झाले आहेत, असे भाजपात पक्षप्रवेश केल्यानंतर म्हटले.


उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारीने वेग घेतला आहे. काँग्रेस सुस्त पडलेली असताना भाजपाने मुख्यमंत्र्यांपासून आमदारांच्या कामाचा आढावा आणि मतदारसंघातील वातावरणाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर आज भाजपाने काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस

Post a Comment

0 Comments