मंत्री अनिल परबांना दिलासा ; नाशिकमध्ये असा गुन्हाच घडला नाही : पोलिसांची क्लिन चीट

 
नाशिक : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात प्रादेशिक परिवहन विभागात भ्रष्टाचार प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची सखोल चौकशी केली असता यात कोणतेही तथ्य नाही, असा महत्त्वाचा खुलासा केला आहे.

परिवहन विभागात भ्रष्टाचार प्रकरण आणि अनागोंदी कारभार होत असल्याच्या पोलिसांना प्राप्त झालेल्या तक्रारीत तथ्य नसल्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्पष्टीकरण दिले आहे.  काही दिवसांपूर्वी नाशिकमधील पंचवटी पोलिसात अनिल परब यांच्याविरोधात गजेंद्र पाटील यांनी तक्रार दिली होती. पदोन्नतीमध्ये गैरव्यहार केल्याचा आरोप त्यांनी केला होता. बदली आणि अनेक प्रकरणात, संगनमत करून करोडोंचा गैरव्यवहार केल्याचा आरोप पाटील यांनी केली होता. परिवहन मंत्री अनिल परब यासह RTO विभागातील 8 उच्चपदस्थ 3 खाजगी 12 जणांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर या प्रकरणाचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचे क्राईम ब्रांचला दिले होते. हाय प्रोफाईल केस असल्याने चौकशी अधिकारी नियुक्त केले होते. गुन्हे शाखा उपायुक्त संजय बारकुंड यांनी या प्रकरणाची चौकशी केली. परिवहन आयुक्तांसह अनेकांचे घेतले जबाब घेतले. तसंच 2 वेळा चौकशी कालावधीस मुदतवाढ देण्यात आली होती. एकूण 35 जणांची चौकशी केली.

चौकशीत तक्रारदार गजेंद्र पाटील यांनी पोलिसांकडे सादर अनेक पुरावे सादर केले.  अखेर बारकुंड यांनी सादर केलेला अहवाल पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पोलीस महासंचालकांना पाठवला आहे. यात  परिवहन मंत्री अनिल परब सह 12 जणांना क्लीन चिट देण्यात आली आहे.  तक्रारीतील तथ्य आणि पुरावे यांचा अहवालात उल्लेख करण्यात आला आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणताही गुन्हा झालं नसल्याचे निष्पन्न झाले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured