Type Here to Get Search Results !

अजनाळे-कमलापूर रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ; अनेक ठिकाणी विनापरवाना रस्ता खुदाई ; मोठा अपघात होण्याची शक्यताअजनाळे/सचिन धांडोरे : डाळिंबाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या अजनाळे गावाला जाणारा कमलापूर पासून ७ किमीचा रस्ता डांबरीकरण केला आहे. या रस्त्याच्या कामासाठी शासनाने कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षापासून हा रस्ता रहदारी साठी सुरळीत झाला असताना शेतकऱ्यांनी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर डाळिंबाच्या बागा जोपासण्यासाठी विनापरवाना रस्त्याच्या या बाजूने त्या बाजूने विनापरवाना चाऱ्या खोदून रस्त्याची वाट लावली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने आठ दिवसाच्या आत हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते युवक नेते गणेश येलपले यांनी केली आहे. अजनाळे गाव हे डाळिंबाच्या उत्पादनात प्रसिद्ध असल्याने राज्यातील परराज्यातील व्यापारी डाळिंब एजंट सह शेतकऱ्यांच्या वाहनांची ये-जा करण्यासाठी या रस्त्यावरून मोठी वर्दळ असते. फेब्रुवारी २०१८ मध्ये या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर  काही महिन्यातच शेतकऱ्यांनी विनापरवाना चाऱ्या खोदून रस्त्याची वाट लावली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी छोटे-मोठे खड्डे पडल्यामुळे या रस्त्यावरून वाहनधारकांना प्रवास करत असताना जिकरीचे बनले आहे खड्ड्याचा अंदाज काही वेळा न आल्यामुळे या रस्त्यावर अनेक छोटे-मोठे अपघात घडले आहेत. 
पावसाळ्याचे दिवस चालू झाल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्यामुळे वाहनधारकांना अंदाज येत नसल्यामुळे छोटे-मोठे अपघात घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वेळीच सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता दुरुस्त न केल्यास खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते गणेश येलपले यांनी दिला आहे.अजनाळे ते कमलापुर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी माझ्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. परंतु लॉकडाऊन असल्यामुळे या रस्त्याचे काम प्रलंबित राहिले आहे. रस्त्याची पाहणी करून विनापरवाना चाऱ्या खोदलेल्या शेतकऱ्यांना नोटीस काढून हा रस्ता आठ ते दहा दिवसात दिवसात दुरुस्त करणार आहे.

अशोक मुलगीर

उपविभागीय अभियंता, सांगोला


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies