Type Here to Get Search Results !

डेल्टा प्लस व्हेरिएंट 'चिंताजनक' घोषित ; “या” तीन राज्याला केंद्र सरकारचा हाय अलर्ट

 




नवी दिल्ली : महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळमध्ये कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्यानंतर आता केंद्र सरकारने या व्हेरिएंटला चिंताजनक व्हेरिएंट जाहीर केलं आहे. तसेच या तीनही राज्यांना केंद्र सरकारने हाय अलर्ट दिला आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, भारतीय सार्स कोव-2 जीनोमिक्स कंसोर्टियमने सूचना दिल्या आहेत की डेल्टा प्लस व्हेरिएंट सध्या 'व्हेरिएंट ऑफ कन्सर्न' आहे. याचा प्रसार जलदगतीने होत आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की, डेल्टा प्लस व्हेरिएंट भारतासहित 80 देशांमध्ये सापडला आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यांत तसेच केरळ आणि मध्यप्रदेशमध्येही डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे या राज्यांना अलर्ट केलं जात आहे. 

कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी या व्हेरिएंटविरोधात प्रभावी आहेत. पण या लसींमुळे शरीरात किती प्रमाणात अॅन्टिबॉडी तयार होतात हे अद्याप स्पष्ट झालं नसल्याचही राजेश भूषण यांनी स्पष्ट केलं. 

जगातील जवळपास 80 देशांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्याचं समोर आलं आहे. आता भारताचाही त्यात समावेश झाला आहे. भारतासोबतच अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, जपान,पोलंड, नेपाळ आणि रशियातही या प्रकारचे रुग्ण सापडले आहेत. 

राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले 21  रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील 9 रुग्ण रत्नागिरीत, जळगावमध्ये 7, मुंबईत 2 आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे 7500 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 





 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies