Type Here to Get Search Results !

इकोनेट संस्थेकडून जांभुळणी व घरनिकी येथे कोरोना तपासणी किटचे वाटप

 


आटपाडी : इकोनेट(पुणे) संस्थेकडून आटपाडी तालुक्यातील जांभुळणी घरनिकी येथे कोरोना तपासणी किटचे वाटप करण्यात आले.



ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भटके-विमुक्त समुदाय पर्यावरण विषयावर काम करणाऱ्या इकोनेट या  संस्थेकडून ग्रामपातळीवर कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकाना कोरोणा तपासणी किटचे वाटप करण्यात आले. आटपाडी तालुक्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचारी युद्धपातळीवर काम करत असताना आरोग्य दक्षता समितीकडूनही ग्रामपातळीवर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय-योजना केल्या जात आहे. याची दखल घेत संस्थेकडून जांभुळणी घरनिकी येथील आरोग्य उपकेंद्रास कोरोना तपासणी किट देण्यात आले.




यावेळी आरोग्य विभागाच्या त्रिशला भोसले, पी.पी नलवडे, शोभा चांदणेइकोमेट संस्थेचे मनोज कांबळे, शिवराम मासाळ, महेश पोतदार, रोहन भिसे, शंकर माने, अमोल मेटकरी, बापू झंजे, प्रकाश मासाळ, विनायक झंजे, राजू भिसे, दिनेश घागरे, गणेश पवार, निलेश सूर्यवंशी, अर्जुन गावडे, यांच्यासह ग्रामपंचायत  दक्षता आरोग्य समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. सरपंच संगीता मासाळ ग्रामसेवक जे.डी.खंडागळे यांनी या उपक्रमाबद्दल इकोनेट संस्थेचे आभार मानले.




 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies