Type Here to Get Search Results !

वडार समाजाच्या मालकीच्या जागेवर होणारे अतिक्रमण हटवा : वडार समाजाची मागणी : तहसीलदारांना दिले निवेदन ; कारवाईची मागणी



दिघंची : दिघंची येथील वडार समाजाच्या मालकीच्या असलेल्या घर जागेवरील होणारे अतिक्रमण हटवून दमदाटी करणाऱ्या लोकांचा कायदेशीर बंदोबस्त करावा, अशी मागणी, मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या माध्यमातून दिघंची येथील वडार समाजाने केली आहे.


दिघंची हायस्कूलच्या पाठीमागच्या बाजूला ६० ते ७० वर्षापासून वडार समाजाची २० ते ३० घरे आहेत. तसेच सदर गायरान जमीन ही वडार समाजाच्या भाऊसाहेब हिराप्पा पवार व हणमंत बंडू पवार या दोन पूर्वजांच्या नावावर आहे. आज ही त्यांच्या नावाचा ८ अ चा उतारा निघत आहे. या दोघांच्या पैकी कोणाची ही पूर्वसंमती न घेता अरुण आत्माराम नाईक या वडार समाजातील व्यक्तीने समाजाच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत, महाराष्ट्र शासनाची गायरान जागा विकता येत नसताना ही खोटी कागदपत्रे सादर करून कल्लाप्पा कुटे व अंकुश ढोले यांना जागा विकली आहे. 


कलाप्पा कुटे व अंकुश ढोले यांनी वडार समाजाच्या लोकांना दमदाटी करून शेड बांधण्यासाठी पत्रे अँगल आणून शेड उभारण्यास सुरुवात केली आहे. ६ जून, २०२१ रोजी सायंकाळी नऊ वाजता यासंदर्भात कलाप्पा कुटे व अंकुश ढोले यांना विचारणा करत असताना, अरुण नाईक याने हणमंत पवार यांना अर्वाच्य शिवीगाळ देऊन दमदाटी केली आहे. त्यामुळे सदर जागेवरील अतिक्रमण तातडीने थांबवण्याची मागणी, मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीने आटपाडीचे तहसीलदार यांना करण्यात आली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies