महाडिबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी या तारखे पर्यंत मुदतवाढ : सहायक आयुक्त संभाजी पोवार

महाडिबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी या तारखे पर्यंत मुदतवाढ : सहायक आयुक्त संभाजी पोवारसांगली : शैक्षणिक वर्ष सन 2020-21 मध्ये महाडिबीटी प्रणाली अंतर्गत भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याकामी दि. 30 जून 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संभाजी पोवार यांनी दिली.


याबाबत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयाच्या दर्शनी भागावर, नोटीस बोर्डवर पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अर्ज रजिस्ट्रेशन करुन घेण्याबाबत सुचना निर्गमित कराव्यात. सर्व पात्र मागासवर्गीय विदयार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात शिष्यवृत्ती/ फ्रीशिप/ RSMS/ निर्वाह भत्ता या योजनांच्या आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन https://mahadbtmahait.gov.in/login/login या संकेत स्थळावर अर्ज भरावेत. याबाबत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास महाविद्यालयातील शिष्यवृत्ती विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. पोवार यांनी केले आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेसPost a Comment

0 Comments