आटपाडी : आटपाडी तालुक्यातील मायक्रो फायनान्सची सर्व कर्ज माफ या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने आटपाडीचे तहसीलदार सचिन मुळीक यांना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल लांडगे यांचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले.
यामध्ये मायक्रो फायनान्स कडील सर्व कर्ज माफ करावे. विधवा, परितक्त्या व निराधार महिलांना दरमहा तीन हजार रुपये पुढील दोन वर्षासाठी अनुदान द्यावे. तसेच रोजंदारीवरील कामगार शेतमजूर व महिला यांना राष्ट्रीय बँकांच्या कडून बिगर जामीनदार व बिगर व्याज पाच वर्षे मुदतीसाठी एक लाख रुपये कर्ज मिळावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे आटपाडी तालुका अध्यक्ष सागर लांडगे, रवींद्र लांडगे, सुशांत लांडगे, यश नाईकनवरे, तुषार लांडगे व पदाधिकारी उपस्थित होते. सदरच्या मागण्या पंधरा दिवसात मान्य न झाल्यास संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस