Type Here to Get Search Results !

इंदापूरजवळ अपघातामध्ये चार जण ठार ; मृत पंढरपूर तालुक्यातील




पुणे :  पुणे-सोलापूर हायवे वरील इंदापूर शहराजवळील पायल हॉटेल च्या जवळ  झालेल्या विचित्र अपघता मध्ये  ४ जण ठार झाल्याची घटना आज दि. ७ रोजी दुपारी ३.०० च्या दरम्यान घडली.


याबाबत अधिक माहिती अशी कि, पुणे सोलापूर हायवे वर इंदापूरनजीक असणाऱ्या पायल हॉटेल च्या जवळ  Ertiga (MH- 46 BE- 4515) ही मोटार पुण्याकडे जात असताना अचानक टायर फुटल्याने डिव्हायडर तोडून विरूद दिशेने गेली. याचवेळी सोलापूर कडे जाणाऱ्या बोलोरा (MH -13 AZ- 3901) या गाडीला  जोरदार धडकली. 


या अपघातामध्ये बोलोरा गाडी मधील 3 जण व Ertiga मधील १ जण जागीच ठार झाले आहेत. यातील तीन जण पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे या गावचे रहिवासी आहेत.अपघातातील मृत व्यक्तींना तातडीने इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies