Type Here to Get Search Results !

खासदार संजय राऊत यांची चौकशी करण्याचे हायकोर्टाचे पोलीस आयुक्तांना आदेश




मुंबई : पेशाने मानसशास्त्रज्ञ असणाऱ्या महिलेने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यावरुन काही पुरुषांकडून मारहाण व छळ केल्याचा ३६ वर्षांच्या महिलेच्या आरोपांबाबत चौकशी करण्याचा आदेश मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत. याबाबत २४ जून पर्यंत न्यायालयात अहवाल सादर करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

तर, ‘ही महिला मला मुलीसारखी आहे. तिच्या कुटुंबाशी, माझ्या कुटुंबाचे स्नेहाचे संबंध आहेत. तिचा पतीसोबत वाद सुरू आहे आणि या प्रकरणात मी तिच्या पतीची बाजू घेत असल्याने, त्या समजातून ती माझ्यावर हे आरोप करत आहे,’ असा दावा राऊत यांच्यावतीने अ‍ॅड्. प्रसाद ढाकेफाळकर यांनी केला होता. यावर, ‘मुलगी असणे आणि मुलीसारखे असणे यात फरक आहे, असं म्हणत या महिलेने राऊत यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies