Type Here to Get Search Results !

कोव्हिड योद्धे माणरत्न सोशल फौंडेशनतर्फे सन्मानितम्हसवड/अहमद मुल्ला : कोरोना महामारीच्या काळात धैर्याने कोरोना रुग्णांची सेवा करून त्यांना कोरोना मुक्त करण्यासाठी दिवस रात्र लढा देत असलेल्या कोव्हिड योध्यांना प्रोत्साहन देण्यासाठी येथील कोव्हीड हॉस्पिटल मधील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांचा येथील माणरत्न सोशल फौंडेशनतर्फे प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी श्री सिध्दनाथ मंदिराचे सालकरी कृष्णात नाळे गुरव, मंदिराचे पुजारी अविनाश गुरव, मठाधिपती रवींद्रनाथ महाराज, डॉ.राजेंद्र मोडासे, डॉ.रोहण मोडासे, डॉ.सिमरन मुल्ला, डॉ.सेहजल मोडासे, डॉ. रोहित पाटील, डॉ.राजेश शहा, आरोग्य कर्मचारी निलेश सरतापे, योगेश सरतापे, अश्विनी लोहार, प्रणव सरतापे, मोहन लांब, मयुरेश शेळके याबरोबरच "आम्ही म्हसवडकर ग्रुप"चे सर्व सदस्य, माणरत्न फौंडेशनचे लखन मंडले, सागर शिंदे, सुशांत तवटे, सद्दाम पटेल, काशीनाथ रूपनवर इत्यादी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies