Type Here to Get Search Results !

“शिव प्रसाद पाहिजे असेल तर पार्सल घेऊन येतो सामना ऑफिसमध्ये.. टेस्ट आवडेल नक्की!” : भाजप नेत्याचे संजय राऊतांना प्रत्युतर

 






मुंबई : शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी भाजपा कार्यकर्त्यांना मोफत पेट्रोल देण्याची घोषणा केली होती. मात्र पेट्रोल पंपावर भाजपा कार्यकर्ते आणि आमदार वैभव नाईक यांच्यात झटापट झाली.

या घटनेवरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांना टोला लगावला आहे. नितेश राणे म्हणाले की, शिव प्रसाद काय असतो ते संजय राऊतांनी आमदार वैभव नाईकना विचारावा. पोटभर दिला आज आमच्या कार्यकर्त्यांनी..पाहिजे असेल तर पार्सल घेऊन येतो सामना ऑफिसमध्ये, टेस्ट आवडेल नक्की!! असा चिमटा त्यांनी शिवसेनेला लगावला. दादर येथील घटनेनंतर संजय राऊतांनी भाजपा कार्यकर्त्यांना शिवप्रसाद दिल्याचं म्हणाले होते. जर थांबला नाही तर शिवभोजन थाळी देऊ असा इशारा दिला होता. त्यावरून नितेश राणेंनी हा टोला लगावला आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies