Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक २० रोजी कोरोना चे ३१ नवे रुग्ण तर २१ रुग्ण कोरोना मुक्त ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा



आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये बाधित रुग्ण प्रमाण वाढले होते. परंतु लॉकडाऊन केल्या नंतर मात्र रुग्ण संख्येला आळा बसला होता. रुग्ण संख्येला आळा बसल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. परंतु गेल्या आठवड्यापासून रुग्ण संख्या वाढू लागली आहे. आज दिनांक २० रोजी कोरोनाचे ३१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.





बाधित रूग्णामध्ये आटपाडी ०३, दिघंची ५, गळवेवाडी ०१, घाणंद ०२, गोमेवाडी ०१, हिवतड ०१, जांभूळणी ०३, खरसुंडी ०३, कुरणवाडी ता. माण ०४, लिंगीवरे ४, पुजारवाडी आ. ०२, उंबर गाव ०२ या गावातील रुग्णाचा समावेश आहे. 





आज आलेल्या कोरोना बाधित रूग्णापैकी पुरुष रुग्ण २० तर स्त्री ११ असे एकूण ३१ नवे रुग्ण कोरोना बाधित आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies