Type Here to Get Search Results !

“या” आमदारांच्या ऑनलाइन उपस्थितीत भाटकी येथे साने गुरुजी बालभवनचे उद्धघाटनम्हसवड/अहमद मुल्ला : भाटकी ता माण येथे दि. 22 जून रोजी राष्ट्रसेवा दल व शिक्षक भारती संघटना  यांच्या पुढाकाराने साने गुरुजी बालभवनचे आमदार कपिल पाटील यांच्या ऑनलाईन उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.

महाराष्ट्र भर साने गुरुजी बालभवनच्या माध्यमातून मुलांना थोर महात्मे,  समाजसुधारक व जीवन कौशल्य ज्ञान विविध पुस्तकांच्या मद्यमातून मिळवून देण्यासाठी व उद्याचा सुजाण नागरिक घडविण्यासाठी हे बालभवन उपयुक्त ठरेल असे उदगार श्री गणेश देवी यांनी व्यक्त केले. तर आमदार कपिल पाटील यांनी महाराष्ट्रातील गावोगावी बालभवन सुरू करून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत ज्ञानगंगा पोहचवावी असे आवाहन केले.याप्रसंगी सातारा जिल्ह्यात विविध तालुक्यात 10 बालभवनचे उदघाटन झाले. या कार्यक्रमात शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष शरद शिर्के यांनी आपले मनोगत व्यक्त करून पाटील साहेबांच्या आवाहनास 100% प्रतिसाद देऊन जिल्हाभर बालभवन सुरू करू असे आश्वासन दिले.
यावेळी शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी केंद्र प्रमुख बाळासाहेब पवार, विभागीय सचिव शहाजी खांडेकर, जिल्हा अध्यक्ष जहांगीर पटेल, माण तालुका अध्यक्ष रमेश शिंदे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दादा शिंदे, बालाजी जाधव, अप्पासो नरळे, श्री. मोरे, श्री.बिरादार, श्री. सावंत उपस्थित होते. तर सर्व तालुके, जिल्हा कार्यकारिणी सदस्य व शिक्षक बांधव ऑनलाईन उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies