“जयंतराव खालच्या पातळीवर जाऊन असा त्रास देणे तुम्हाला शोभत नाही” ; चंद्रकांत पाटील
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांचे राजकीय विरोधक निशिकांत पाटील आहेत. ‘‘इस्लामपूर या गावात भाजपाचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचे रूग्णालय आहे. या रूग्णालयात सहाशे रूग्णांची क्षमता आहे. त्यासाठी आवश्यगक त्या कागदपत्रांची पूर्तता करून परवानगी मिळविली आहे. मात्र, त्यांना केवळ शंभर रूग्णांची परवानगी दिली आहे. आता रूग्णालयाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. जयंत पाटील कोरोना काळत चांगले काम करणाऱ्या रूग्णालयाला राजकीय भूमिकेतून त्रास देत असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

कोरोनाच्या काळात स्वत:हून पुढे येणाऱ्या रूग्णालयांना मदत करण्याऐवजी त्रास देण्याचा प्रकार अशोभनीय आहे. केवळ राजकीय विरोधा पोटी त्रास देणे बरोबर नाही. इस्लामपूर नगरपालिकेची सत्ता जयंतरावांच्या हातातून हिसकावल्याने अशाप्रकारे त्रास देणे योग्य नाही.

चांगले काम करणाऱ्या विरोधकाला त्रास देण्याची परंपरा स्वर्गीय राजारामबापू पाटील यांची मुळीच नाही. खरेतर जयंत पाटील यांचीही नाही. मात्र, आता ते खालच्या पातळीवर जाऊन त्रास देत आहेत. असे करणे योग्य नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. निशिकांत पाटील यांची काही चूक असेल तर चौकशी करायला हरकत नाही. मात्र, काहीच चूक नसताना चांगले काम करणाऱ्या रूग्णालयास त्रास देणे योग्य नसल्याचे पाटील यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured