Type Here to Get Search Results !

जांभूळणी दुर्घटना : व्हनमाने कुटुंबीयांचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांत्वनआटपाडी : घाणंद येथील शेतकरी लहु तुकाराम व्हनमाने यांच्या घरातील ३ भावंडांचा वाहत्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने दुःखाचा प्रचंड आघात झालेल्या व्हनमाने कुटुंबीयांचे दिनांक ०८ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांत्वन केले.


जांभूळणी ओढ्यालगत शेतजमीन असलेले लहु तुकाराम व्हनमाने आपला मुलगा वैभव (वय १८), पुतणे आनंदा अंकुश व्हनमाने (वय १७) आणि विजय अंकुश व्हनमाने (वय १६) यांच्या समवेत आपल्या शेतावर गेले होते. त्यावेळी या सर्वांनी मासे पकडल्यानंतर अचानक फोन आल्याने लहू व्हनमाने गावात गेले होते. अर्ध्या तासात परत आल्यावर तिन्ही मुले शेताजवळ नसल्याने बऱ्याच वेळ शोधाशोध केल्यानंतर या तिन्ही मुलांसमवेतच असलेल्या पाळीव कुत्र्याचा पाण्यात आढळून आलेला मृतदेह पाहून मुलांच्या बाबतीत काहीतरी अघटीत झाले नाही ना? अशी शंका आल्याने ओढ्याखालील दोन्ही बंधार्यांपर्यत शोधा-शोध केली .तथापि दुसऱ्या दिवशी सकाळी तपास पथकाने या तीन्ही भांवडांची प्रेते बंधाऱ्याच्या पाण्यातून बाहेर काढल्यानंतर व्हनमाने कुटूंबियांवर नियतीने क्रुर घाला घातल्याचे स्पष्ट झाले.


सहा फुटावरून पडून मृत्यू पावलेला भाऊ, चालता बोलता गेलेले चुलते आणि वडिल यांच्या जाण्याने खचलेल्या लहु व्हनमाने यांनी घरातल्या स्त्रिया आणि चार मुलांसमवेत कुटूंबांला काबाड कष्टाद्वारे सुस्थितीत आणत सावरले होते. तथापि दहावी अकरावीतल्या ३ मुलांना नियतीने अचानक हिरावून नेल्याने या प्रचंड दु :खातून हे कुटुंब मोडून पडल्याचे दिसत होते. धाय मोकलून रडणारे व्हनमाने कुटुंबीयांचे दुःख पाहून भेटीस येणाऱ्या प्रत्येकाचे मन पिळवटून टाकत होते,डोळे पाणावत होते.


लहू व्हनमाने यांचे सांत्वन करताना या प्रचंड दुःखातून सावरत कुटुंबाला न खचता धीर द्या, दुःखातून सावरत पुढे मार्गकमण करा. तुमच्या दुःखात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहभागी असून विधात्याने या प्रचंड दुःखातून सावरण्याची शक्ती तुम्हां सर्वांना द्यावी अशी आम्ही प्रार्थना करतो. अशा भावना या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ट नेते खानापूर आटपाडी मतदार संघाचे माजी अध्यक्ष आनंदरावबापू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे खानापूर आटपाडी मतदार संघाचे विद्यमान अध्यक्ष सुशांत देवकर, विट्याचे माजी नगराध्यक्ष युवा नेते वैभवदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव प्रा.एन.पी.खरजे, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय यमगर, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अमित ऐवळे, राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस विजय पुजारी यांचा सांत्वन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यात समावेश आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies