Type Here to Get Search Results !

झेपत नाही, कळत नाही, वसुलीपुढे सरकत नाही अशी राज्य सरकारची तऱ्हा !आटपाडी : मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने लक्ष घालावे, या प्रमुख मागणीसह इतरही महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून दिल्लीतील ही पहिलीच भेट असणार आहे. परंतु आता मात्र याच भेटीवरून भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टोला लगावला आहे. 'झेपत नाही, कळत नाही, वसुलीपुढे सरकत नाही, अशी राज्य सरकारची तऱ्हा. सतत मागत राहता, यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये? असे भाजपने म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हेदेखील उपस्थित राहणार आहेत. या भेटीवर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये भातखळकर यांनी लिहिले आहे, "आज आलं अंगावर ढकललं केंद्रावरचा एपिसोड दिल्लीत. वसुलीत गर्क असल्यामुळे ठाकरे सरकारने आरक्षणाचा जो काही गुंता केलाय, तो सोडवा अशी विनंती पंतप्रधानांना करणार. झेपत नाही, कळत नाही, वसुलीपुढे सरकत नाही अशी राज्य सरकारची तऱ्हा. सतत मागत राहता, यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये?"

Join Free WahtasApp माणदेश एक्सप्रेसPost a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies