Type Here to Get Search Results !

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक





मुंबई : मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा मेल आल्यानं मंत्रालयात खळबळ उडाली होती. धमकीचा मेल आल्यानंतर मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झालं. मात्र याठिकाणी कोणतीही स्फोटक वस्तू आढळून आलेली नाही. मात्र, खबरदारी म्हणून या परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. शैलेश शिंदे असं अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. त्याला कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक करण्यात आली आहे. शैलेश शिंदेचं वय 45-50 च्या दरम्यान आहे. 

त्यांनी आपल्या मुलाचे पुण्यातील वानवडी येथील हाचिंग्स शाळेने एका वर्षाचे नुकसान केले म्हणून तीन वर्षांपूर्वी उपोषण केले होते. याशिवाय शिक्षण विभागाकडे याप्रकरणी वारंवार तक्रार करूनही लक्ष न दिल्याने शैलेश शिंदे यांनी मंत्रालयात धमकी वजा इशारा ईमेल पाठविला होता. याबाबत मुंबई मंत्रालयातून माहिती मिळताच पुणे पोलिसांनी त्याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. आता त्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. मुंबई पोलीस पुढील कारवाई करत असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. मुंबईत मरीन लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असल्याची माहिती आहे. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies