मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ठाकरे आणि पवार यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेना हा राज्यातील प्रमुख पक्षांपैकी एक आहे. शिवसेनेची स्थापना स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 साली आजच्या दिवशी केली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षदेखील राज्यातील प्रमुख पक्ष आहे.
जयंत पाटील म्हणाले की, 'भूमिपुत्रांना या राज्यात सन्मानाचे स्थान मिळवून देण्याच्या उद्देशातून शिवसेनेचा जन्म झाला. राज्यातील सामान्य लोकांच्या हक्कांसाठी शिवसेनेने कायमच संघर्ष केला आहे. राज्यातील सामान्य घरातील तरुणांना शिवसेनेनेच आमदार, खासदार, मंत्री केलं आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय शरद पवार साहेब यांची शिवसेनेच्या स्थापने पुर्वीपासून मैत्री होती. आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस पक्षाच्या या राज्यातील सरकारने देशाला नवी दिशा दिली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे व सर्व शिवसैनिकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा !
भूमिपुत्रांना या राज्यात सन्मानाचे स्थान मिळवून देण्याच्या उद्देशातून शिवसेनेचा जन्म झाला. राज्यातील सामान्य लोकांच्या हक्कांसाठी शिवसेनेने कायमच संघर्ष केला आहे. @ShivSena @CMOMaharashtra @AUThackeray pic.twitter.com/ftU7OisnPv
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 19, 2021