Type Here to Get Search Results !

नवनीत राणा तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा देखील अवमान केलाअमरावती : नवनीत राणा तुम्ही लाखो अमरावतीकरांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा देखील अपमान केला आहे. त्यामुळे तुमच्यामध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर तुम्ही आता खासदारकीचा राजीनामा द्या, आणि पुन्हा अभिनय क्षेत्रात नशीब आजमावून पाहा, असा खोचक सल्ला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना दिला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार नवनीत राणा यांनी दाखल केलेले जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याच्या प्रकरणावर उच्च न्यायालयाने शिक्का मोर्तब केल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी हा सल्ला दिला आहे.अमरावती लोकसभा मतदारसंघात हा अनुसूचित जाती साठी राखीव आहे. पण खासदार नवनीत राणा यांनी जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करून त्यांनी ही खासदारकी जिंकली. दरम्यान उच्च न्यायालयाने निर्णय देत त्यांचे जात वैधता प्रमानपत्र रद्द केले आहे. ’नवनीत राणा अभिनय क्षेत्रात रिटेक वर रीटेक देऊन एखादा सिन परफेक्ट करता येईल. पण अमरावतीची जनता तुम्हाला आता रीटेकची संधी देणार नाही. आपण अमरावतीच्या लाखो जनतेचा अपमान तर केलाच आहे. सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा देखील अपमान केला आहे’, अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies