Type Here to Get Search Results !

“तिसऱ्या लाटेत एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नाही” ; धनंजय मुंडेंचा संकल्प




बीड : राज्यात कोरोनाची येणारी तिसरी लाट ही गंभीर आहे. त्यामुळे या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी परळी सज्ज आहे. त्यासोबतच परळीतील एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नाही, असा संकल्प सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे. 

परळी शहरातील हलगे गार्डनमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या 24 तास सेवा देणाऱ्या हातांचा गौरव, “सेवा गौरव समारोहा” च्या माध्यमातून पार पडला. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली. या कार्यक्रमामध्ये डॉक्टर्स, आरोग्य सेवक, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, पत्रकार यांसह कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या दूतांचा गौरव करण्यात आला आहे. या कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनाच्या तिसर्याा लाटेत एकही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नाही, असा संकल्प त्यांनी केला.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies