Type Here to Get Search Results !

गोमेवाडी जवळ अपघातात एक ठार, एक जखमीआटपाडी : आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी हद्दीत भावड्याच्या टेकावर बोलेरो जीप व ट्रकचा अपघात झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक गंभीर जखमी आहे. जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. मयत झालेल्या व्यक्तीचे नाव पप्पू नारायण सावंत (रा. वायफळे, तालुका तासगाव) असे आहे. तर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव विनायक महादेव नलवडे, रा. वायफळे, तालुका तासगाव असे आहे.


आटपाडी पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दि. ८ रोजी स. 10.27 वाजता गोमेवाडीच्या हद्दीत, आटपाडी-भिवघाट रोडवर भावड्याच्या टेकाजवळ हा अपघात झाला आहे. पप्पू नारायण सावंत हा भरधाव वेगाने बोलेरो जीप चालवत होता. त्याला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याची बोलेरो जीप, नंबर एमएच - १०, बीके-२५५२ , वरील ताबा सुटल्याने सदर जीपने समोर वाळू भरून जात असणाऱ्या ट्रकला (एमएच१०-एडब्ल्यू-७८२७) पाठीमागून उजव्या बाजूला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात बोलोरो जीप ड्रायव्हर, पप्पू सावंत याचा जागीच मृत्यू झाला असून, विनायक नलवडे हा गंभीर जखमी झाला आहे. 


आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अपघाताचा पंचनामा केला आहे. पुढील तपास पोलीस फौजदार कांबळे करीत आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies