Type Here to Get Search Results !

अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांच्या विटा व कवठेएकंद येथील शासकीय निवासी शाळेत ऑनलाईन व ऑफलाईन प्रवेश सुरू



सांगली : समाजकल्याण विभाग, सांगली यांच्या अधिपत्याखालील खानापूर तालुक्यातील विटा  व तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांच्या शासकीय निवासी शाळेत नियमित सत्र 2021-22 करीता मोफत ऑनलाईन व ऑफलाईन प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेश अर्ज सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत उपलब्ध आहेत. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक यांनी दिली.




विटा येथील शासकीय निवासी शाळेत सहावी ते दहावीला सेमी इंग्लिश मराठी माध्यमध्ये व कवठेएकंद येथील शासकीय निवासी शाळेत सहावी ते नववीला सेमी इंग्लिश व दहावीला मराठी माध्यममध्ये मोफत ऑनलाईन व ऑफलाईन प्रवेश देणे सुरू आहे. यामध्ये अनुसूचित जाती 80 टक्के, अनुसूचित जमाती 10 टक्के, विमुक्त व भटक्या जाती जमाती 5 टक्के, विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के आणि दिव्यांगासाठी 3 टक्के राखीव आरक्षीत प्रवेश देण्यात येत आहे. 




या शाळेत सर्व सुविधा मोफत दिल्या जातात. प्रवेशासाठी शाळा सोडल्याचा दाखला (टीसी), गुणपत्रिका, तहसिलदार उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, पासपोर्टसाईज फोटो, आधार कार्ड, बँक पासबुक, संचयिका पुस्तक, वैद्यकीय प्रमाणपत्र व पालकाचे हमीपत्र कागदपत्रांची आवश्यकता आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies