Type Here to Get Search Results !

“मुख्यमंत्र्यांच्या मनात काय चाललंय, हे रश्मी वहिनींनाच माहीत असेल”

 
मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बनंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही भाष्य केलं आहे. “प्रताप सरनाईक जे म्हणतात ते खरं आहे, पण त्यांच्या म्हणण्याने काही परिवर्तन होणार नाही, होत नाही. परिवर्तन उद्धवजींना वाटल्यानंतरच होणार आहे. आणि उद्धवजींना स्वतःला वाटेल की आता महाविकास आघडीमध्ये असह्य झालं आहे आणि रोज उठून चुकीच्या फाईलवर सह्या करण्याचं प्रेशर येत असतं, रोज उठून हिंदुत्वाशी तडजोड करावी लागते, तेव्हा त्यांच्या मनात येऊ शकतं”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

ज्या तपास यंत्रणा घटनेने तयार केल्या आहेत, त्यावर अविश्वास दाखवणे योग्य नाही. ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना आयुष्यभर ज्यांना दोष दिला, शिव्या घातल्या, खड्यासारखं दूर ठेवले, त्यांना बरोबर घेऊन सरकार स्थापन केलं, त्या दिवसापासून ही खदखद होती. शिवसेनेमध्ये एक शिस्त आहे, जे म्हणायचं असेल ते उद्धव ठाकरेंना म्हणतील, बाहेर येऊन प्रेससमोर मांडणार नाही. पण त्या शिस्तीलाही एक अंत असतो, त्यामुळे प्रताप सरनाईक यांनी एक पत्र लिहिलं . पण ते पत्र खासगी असूनही लीक झालं. सरकारी पत्र लीक होऊ शकतं. पण तुमच्या घरातलं पत्र कसं लीक होऊ शकतं? याचा अर्थ तुम्हाला आता आमदारांच्या मनातली खदखद बाहेर ऑन पेपर आणायची आहे. आणि त्यातून अशी परिस्थिती निर्माण करायची आहे की आता सर्व आमदारांच्या मनोगताला मान देऊन, असं कदाचित बॅकग्राऊंड तयार करायचं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

उद्धवजींच्या बाबतीत माझा अनुभव असा आहे की, उद्धव ठाकरेंना काय म्हणायचं आहे ते त्यांच्या बॉडी लॅंग्वेजमधून फार कमी वेळा कळतं. ते काँग्रेससोबत जातील असं वाटलं नव्हतं. त्यांच्या मनात राग होता आणि ते सोबत गेले. आता तसं परिवर्तन करण्याची वेळ आली आहे की नाही, त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे माहीत असेलच तर ते रश्मी वहिनींना माहीत असेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies