“नाहीतर राऊतांना वाटेल की, मी काहीही केलं तरी कुणाचा बाप मला काही करू शकणार नाही”

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर पेशाने मानसोपचारतज्ज्ञ असलेल्या या महिलेने काही व्यक्ती संजय राऊत आणि तिच्या पतीच्या सांगण्यावरून आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

भाजपा नेते निलेश राणे यांनी सदर प्रकरणावरून संजय राऊतांवर एका व्हिडीओच्या माध्यमातून टीका केली आहे. “संजय राऊतांच्या विरोधात एका महिलेने तक्रार केली आहे. अनेक महिन्यांपासून ती महिला मुंबई पोलिसांकडे जाऊन सांगतेय की मला संरक्षण द्या, मला हा माणूस छळतोय, माझ्यामागे हेर लावले आहेत. त्याच्याविरोधात माझ्याकडे ऑडिओ क्लिप, व्हिडीओ क्लिप आहेत. एका व्हिडीओमध्ये तर चक्क संजय राऊतांनी या महिलेला आई-बहिणीवरून शिव्या घालून त्यांना धमकी दिली आहे. पण एवढे पुरावे असूनही एक साधी तक्रार त्या महिलेची मुंबई पोलिसांनी घेतलेली नाही. शेवटी कोर्टाला त्यावर अहवाल देण्यास सांगावं लागलं. करोना काळात कोर्ट वगैरे बंद होतं म्हणून त्याला वेळ लागला. पण संजय राऊत किती भयानक माणूस आहे हे समोर आलं आहे”, असं निलेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, व्हिडीओमध्ये निलेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संजय राऊतांवर वेळीच कारवाई केली नाही, तर त्यांना वाटेल की मुंबईत, महाराष्ट्रात मी काहीही केलं तरी कुणाचा बाप मला काही करू शकणार नाही. ही त्यांची समज ठेचून काढण्यासाठी आपण सगळ्यांनी त्या महिलेच्या पाठिशी उभं राहायला हवं, असं निलेश राणे या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured