Type Here to Get Search Results !

सातारा जिल्ह्यात अत्यावश्यक नसलेली दुकाने व आस्थापना सोमवार ते शुक्रवार सुरु ठेवण्यास परवानगी : जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांचे सुधारित आदेश जारी



सातारा : कोविड बाधीत रुग्णांचा पॉझीटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस व्यापलेची टक्केवारीच्या निकषानुसार सातारा जिल्हयाचा तिसऱ्या स्तरामध्ये समाविष्ट होत असलेने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 व आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 19/06/2021 रोजीचे 00.00 वा पासून ते पुढील आदेश होईपर्यंत खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.




आर्थिक, सामाजिक क्रिया कलाप यावर खालील प्रमाणे निर्बध लागू करण्यात येत आहेत. सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वानुसार सातारा जिल्हयामध्ये आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 5.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी 5.00 वाजलेपासून ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत संचार बंदी लागू करण्यात येत आहे. त्यामुळे संचारबंदीच्या वेळेत वैध कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीस संचार करण्यास मनाई करण्यात येत आहे.




सातारा जिल्हयातील सर्व शाळा, महाविदयालये, कोचिंग क्लासेस पुर्णपणे बंद राहतील. तथापि, ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल. तसेच वैदयकीय महाविदयालये, नर्सिंग कोर्सेस चालू ठेवण्यास परवानगी असेल.



 

अत्यावश्यक बाबीची दुकाने, आस्थापना या आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 9.00 ते सायं 04.00 वा पर्यत चालु ठेवण्यास परवानगी असेल. मात्र मेडिकल, औषधांची दुकाने सकाळी 9.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत चालू राहतील. तथापि, हॉस्पीटल मधील मेडिकल, औषधांची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी असेल. अत्यावश्यक नसलेली दुकाने,आस्थापना ही सोमवार ते शुक्रवार सकाळी 09.00 ते सायं. 04.00 वा पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मॉल, सिनेमागृहे (एक किंवा अनेक पडदी)/ नाटयगृहे इ. पुर्णपणे बंद राहतील.



सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते सायं 04.00 या कालावधीत हॉटेल, रेस्टॉरंटस् यांना आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी असेल. तसेच आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 07.00 ते रात्री 08.00 या कालावधीत घरपोच पार्सल सेवा चालू ठेवण्यास परवानगी असेल. लॉजिंग, बोर्डींग चालू ठेवण्यास परवानगी असेल. तसेच लॉजिंग मध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तींना सकाळी 07.00 ते सायं 04.00 या कालावधीतच रेस्टॉरंट मध्ये सेवा देता येईल व त्यानंतर त्यांचे वास्तव्य असलेल्या रुम मध्ये सेवा पुरविणे बंधनकारक असेल.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies