आटपाडी : देशात तसेच राज्यात सातत्याने महागाई वाढतच चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात आटपाडी तालुका काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष डी.एम. पाटील यांच्या नेतृत्वाखाली चक्क पेट्रोल पंपावरच पेट्रोलचे दरवाढी बद्दल केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी विठ्ठल ढोबळे, मोहन खरात, व्ही.एम. देशमुख, शिवाजी दबडे, राजाराम सरगर, वसीम मुल्ला, बाळासाहेब गायकवाड, भानुदास खांडेकर, आबा सागर आदींनी उपस्थित होते.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस