पोलीस उपनिरीक्षकाचा अवघ्या 36 व्या वर्षी मृत्यू

पोलीस उपनिरीक्षकाचा अवघ्या 36 व्या वर्षी मृत्यूसोलापूर : सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात उपनिरीक्षक असलेल्या राहुल बोराडे यांचा वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी निधन झालं. ते सोलापूर पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत असलेल्या जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. बोरोडे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. काही दिवस उपचार घेऊन बोराडे घरी देखील परतले होते. मात्र त्रास वाढल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जवळपास एक महिना त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार झाले. मात्र अखेर मंगळवारी त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झूंज संपली. 


राहुल बोराडे यांना 3 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्याआधी त्यांचे आई-वडील तसेच अवघ्या सात वर्षांच्या मुलीला देखील कोरोनाची लागण झाली होती. काही दिवस उपचार घेऊन सर्व जण घरी देखील परतले. मात्र राहुल यांना फुप्फुसाचा त्रास होत असल्याने पुन्हा एकदा सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात देखील त्यांना हलविण्यात आले. मात्र अखेर मंगळवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी तसेच अवघ्या चार वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांची मुलगी असा परिवार आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस

Post a Comment

0 Comments