Type Here to Get Search Results !

डोंगरात नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कारऔरंगाबाद : वाळूज परिसरातील खवड्या डोंगर परिसरात निर्जनस्थळी नेऊन एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपी तरुण हा पीडित मुलीचा मित्र आहे. आरोपीने आपल्या मैत्रिणीला गप्पा मारण्याच्या बहाण्याने खवड्या डोंगर परिसरात दुचाकीवरून नेले. याठिकाणी त्याने अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार केला. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीसांनी आरोपीवर बलात्कार, अपहरण आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


संबंधित अटक केलेल्या 22 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव सोमेश भिकुलाल मुंगसे असून तो तिसगाव येथील रहिवासी आहे. आरोपीने पीडित मुलीसोबत काही दिवसांपूर्वी मैत्री केली होती. विश्वास संपादन केल्यानंतर, 4 जून रोजी आरोपी पीडितेला गप्पा मारण्याचा बहाणा करत दुचाकीवरून खवड्या डोंगराच्या पायथ्याशी घेऊन गेला. याठिकाणी आरोपीने संधीचा फायदा उचलत पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान मुलगी अचानक बेपत्ता झाल्यामुळे पालकांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याचा गुन्हा नोंदवला.


दुसरीकडे, आरोपीने बलात्कार केल्यानंतर पीडित मुलीला स्वत:च्या घरी नेले. दुसऱ्या दिवशी आरोपीने पीडितेला सिडको येथील एका उद्यानासमोर सोडून फरार झाला. भेदरलेल्या अवस्थेत असणाऱ्यापीडित मुलीची माहिती स्थानिक नागरिकांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांना दिली.


वाळूज एमआयडीसी पोलिसांनी 6 जून रोजी रात्री उशीरा आरोपी तरुणाला औद्योगिक परिसरातून अटक केली. 7 जून रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies