Type Here to Get Search Results !

रिक्षाचालकाच्या मुलीची गळफास घेत आत्महत्या ; मृत्यूचे गूढ कायम



नांदेड : नांदेड शहरातील एसव्हीएम कॉलनीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीने 7 जून रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलीने अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन हादरली आहे. संबंधित मुलीने आत्महत्या का केली? याची पुष्टी अद्याप करण्यात आली नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.


संबंधित आत्महत्या केलेल्या 16 वर्षीय मुलीचं नाव देविका नारायण बेहरे असून तिचे वडील एक ऑटोरिक्षा चालक आहेत. देविकाने 7 जून रोजी दुपारी चारच्या सुमारास आत्महत्या केली आहे. घरात कोणी नसताना देविकाने घरातील पंख्याला साडीने गळफास घेऊन स्वत:ला संपवले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर किनवट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies