Type Here to Get Search Results !

पोलिसांची मोठी कारवाई ; गांजासहित चारचाकी गाडी जप्त
सांगोला : सांगोला पोलिसांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचा बडगा उचलला असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणत कारवाई करण्यात येत आहे.  त्यातच आता पोलिसांनी महूदवळ मोठी कारवाई करीत गांजा सहित एक चारचाकी गाडी जप्त केली आहे. 


याबाबत सविस्तर हकीकत अशी,  दि०६ रोजी मिळालेल्या गुप्त बातमीनुसार मौजे गायगव्हाण हददीतील जय भवानी हॉटेल समोर मिळालेल्या गुप्त बातमीनुसार सापळा रचुन पंढरपुर कडुन येणारे न वाहनाची वाट पाहत असताना दि. ०७रोजी एक वाहन वेगाने महुदकडे येताना दिसुन आल्याने त्यास थांबवुन त्यांची तपासणी केली असता सदर पिकअपमध्ये एकुण ११ पोती उग्रदर्प असलेला ओलसर हिरवट रंगाचा बियासह असलेला गांजा एकुण ३१८.०९५ कि.ग्रॅ वजनचा ६३,६१,९००/-रू किमंतीचा, ०१ पांढरे रंगाचे पिकअप नं.एम एच १२ जे.एफ.१४४४ व ०१ पिवळी रंगाची ताडपदरी असा एकुण ६९,६२,४००/रू माल मिळुन आल्याने जप्त करण्यात आलेला आहे.


तसेच पिकअप चालक यास जागीच ताब्यात घेण्यात आलेले आहे. पुढील कार्यवाही करून सपोनि/नागेश यमगर यांनी सांगोला पोलीस स्टेशनला फिर्याद देवुन गुन्हा दाखल केलेला आहे. सदरची कामगीरी तेजस्वी सातपुते,पोलीस अधिक्षक,सोलापुर ग्रामीण, अतुल झेंडे,अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली राजश्री पाटील, (उपविभागीय अधिकारी सो मंगळवेढा विभाग मंगळवेढा),  सुहास जगताप,पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस ठाणे, सपोनि/नागेश यमगर,पोसई/संदेश नाळे, सहा.पोलीस फौजदार,कल्याण ढवणे, सहा.पोलीस फौजदार, दत्तात्रय तोंडले, पोहेकॉ/१०१९ झोळ, पोहेकॉ/१६४०आप्पासो पवार, पोना/१४८ सुनिल मोरे, पोकॉ/अभिजीत साळुखे, पोना/२६४ क्षिरसागर,पो.कॉ.जमीर मुजावर ब.न.७० व चालक पोकॉ/नदाफ ब.न. ७१९,पोकॉ/लोढे, पोकॉ/७७५ सुमित, पिसे, होमगार्ड/गणेश झाळबुके यांनी पार पाडलेली आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेसटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies