Type Here to Get Search Results !

शिवसेना पक्ष इतका भिकारी झाला आहे की...

 




सिंधुदुर्ग : आज शिवसेनेचा ५५ वा वर्धानपनदिन आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर विविध उपक्रम शिवसेनेकडून आणि शिवसनेच्या विविध संघटनांकडून आयोजित केले गेले आहेत. असाच एक उपक्रम, सिंधुदुर्गातील एका पेट्रोल पंपावर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी, भाजपला डिवचण्यासाठी सुरु केला. त्यांनी या पेट्रोल पंपावर स्वस्तात पेट्रोल वाटप सुरु केले. मात्र, हा पेट्रोलपंप नेमका नारायण राणे यांच्या मालकीचा निघाला आणि नारायण राणेंची मालकी असलेल्या या पेट्रोल पंपावर, शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी सकाळी तुफान राडा झाला आहे.

यानंतर निलेश राणे यांनी लगेच ट्विट करत शिवसेनेची लायकी काढली असून, “शिवसेना पक्ष इतका भिकारी झाला आहे की त्यांच्या आमदाराला दुसऱ्यांच्या पेट्रोल पंपावर फुकट पेट्रोल भरून शिवसेनेचा वर्धापन दिवस साजरा करायचा आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक भिकाऱ्यासारखा पंपा बाहेर उभा होता तेव्हा त्याला तिथून हाकलून दिलं. ही लायकी आजच्या शिवसेनेची आहे,” असा घणाघात त्यांनी केला आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies