मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शिवसेनेला लक्ष्य करणारे भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या बॅनरवरून शिवसेनेवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. तसेच, शिवसेनेचे स्थानिक आमदार वैभव नाईक यांच्यावर देखील त्यांनी शेलक्या शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.
भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या एका बॅनरचा फोटो ट्वीट करून त्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “शिवसेनेचा वर्धापन दिनाचा बॅनर पण शिवसेना आमदार नाईकसारखा निघाला. एका तासात उलटा झाला. शिवसेना पक्षाची हालत पण या बॅनरसारखीच झाली आहे. वाईट वाटतं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी. त्यांनी पक्षाची सुरुवात केली वाघांना घेऊन. संपणार कुत्र्यांमुळे”, असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे.
शिवसेनेचा वर्धापन दिनाचा बॅनर पण शिवसेना आमदार नाईक सारखा लुक्का निघाला... एका तासात उलटा झाला. शिवसेना पक्षाची हालत पण या बॅनर सारखीच झाली आहे. वाईट वाटतं स्व. बाळासाहेब ठाकरेंसाठी, पक्षाची सुरुवात केली वाघांना घेऊन... संपणार कुत्र्यांमुळे. pic.twitter.com/088HfPjuav
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 19, 2021