Type Here to Get Search Results !

शिवसेनेच्या ‘या’ दिग्गज नेत्याला ह्रदयविकाराचा झटका ; मुलीच्या फेसबुक पोस्टनंतर शिवतारे कुटुंबातील कलह समोर

पुणे : शिवसेनेचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईमधील ब्रीच कॅण्डी रुग्णालयाच्या आयसीयूत ते दाखल आहेत. यादरम्यान त्यांच्या मुलीने फेसबुकवर पोस्ट टाकत गंभीर आरोप केले असून यामुळे शिवतारे कुटुंबातील कलह समोर आला आहे. ममता लांडे-शिवतारे यांनी ही पोस्ट लिहिली असून विजय शिवतारे यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केली आहे. ममता लांडे-शिवतारे या आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या पत्नी आहेत.शिवसेनेचे नेते, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवतारे यांची मुलगी डॉ. ममता शिवदीप लांडे आणि त्यांच्या आई व विजय शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी यांच्या फेसबुक पोस्टमधून हे वाद उघड झाल्याने राजकीय क्षेत्रात शिवतारे दोनवेळा आमदार झालेल्याम पुणे जिल्ह्यातील पुरंदर- हवेली मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे.आज दिनांक २२/०६/२०२१ वेळ पहाटे ३:००, ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आय सी यू (ICU) विभागात बसून हे लिहिण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं. मी ममता शिवदीप लांडे-शिवतारे, आजवर आपण बापूंच्या राजकीय कारकीर्दीत क्वचितच मला पाहिले असेल; मग आज मी बोलत आहे तर नक्कीच त्यामागे एक मोठे कारण आहे.बापूंसारखे वडील मला मिळाले हे माझे भाग्य. मला त्यांनी फुलासारख जपलं. माझी प्रत्येक जबाबदारी अतिशय खंबीरपणे पार पाडली. मला अपार प्रेम दिल. माझ्या आयुष्यात त्यांना देवापेक्षाही वरच स्थान आहे. अश्या माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून आज मी अत्यंत अवस्थ आहे.मागील काही दिवसात फेसबुक वरून होत असलेल्या पोस्टने आपल्या मनात संभ्रम निर्माण केला आहे. माझा भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी ही कित्येक वर्ष असाच त्रास बाबांनी सहन केला. मात्र कधीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही, कारण त्यामुळे माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबाला हानी पोहोचेल अस त्यांना वाटत होतं व आजही वाटतं.मागील वर्षी जानेवारी २०२० मध्ये अत्यंत गंभीर प्रकृती असताना त्यांचे बायपास झाले. हे आपणा सर्वांना माहीतच आहे. डॉक्टरांनी त्यांच्या वाचण्याची शक्यता २० टक्के आहे, असे सांगितले हाेते. माझा भक्कम असा आधारस्तंभ ढासळतो की काय, या भीतीने माझी झोपच उडाली होती. ऑपरेशन यशस्वी झालं, मात्र त्यानंतरही जीवाला धोका असताना माझा मोठा भाऊ सतत धमक्या देऊन मानसिक त्रास देत होता. मागील दीड वर्षापासून किडनीच्या आजारामुळे बाबा एक दिवसाआड डायलीसिसला जातात. या दीड वर्षात एकदाही माझ्या दोन्ही भावांपैकी कोणीही त्यांना भेटायला सुद्धा आले नाही. ते आहेत की नाही ? याची सुद्धा विचारपूस केली नाही. त्यांची प्रकृती नाजूक असल्याने मानसिक दबाव अजून वाढवून, त्यांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सूरु झाले. आजवर आयुष्यभर कमावलेली सगळी संपत्ती विनय व विनस व त्यांच्या कुटुंबाच्या नावे बाबांनी केली. तरीही जेजुरीतील इथेनॉल प्लांट नावावर करून देण्यासाठी वारंवार त्यांच्याकडून दबाव टाकण्यात येत आहे. या सर्व गोष्टीत मी कायम फक्त बघ्याची भूमिका बजावत होती. मी स्वतः डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घेते. मी जानेवारी २०२१ मध्ये हॉस्पिटलचा राजीनामा दिला. यानंतर पूर्ण वेळ बाबांसोबत राहून त्यांच्या कामाचा ताण कमी करण्याचा व आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कदाचित त्यांना बळ मिळाले. त्यांचनी विनयच्या धमक्यांकडे लक्ष दिलं नाही. मात्र मागील दोन महिन्यांपासून तो दबाव सोशल मीडियाद्वारे बदनामी करून सतत वाढवला जात आहे. सर्व संपत्ती नावावर करुनही मानसिक त्रास कमी होत नव्हता. तो आताही अश्याच बदनामीच्या धमक्या देत आहे. आपण माझ्या बाबांवर अफाट प्रेम केलंत. तेच त्यांच्यासाठी सर्वस्व आहे. ते प्रेम कधीही कमी पडू देऊ नका. आणि बाबाही अविरत पुरंदरसाठी आपला जीव ओततील.आज सर्व काही सहनशीलतेच्या पलीकडे गेलं आहे. आणि त्याच धक्क्याने त्यांना पहाटे हृदयविकाराचा झटका आला. आयसीयुमध्ये रात्री २ वाजता मी त्यांना घेऊन आली, ऍडमिट केले .       

   

माझी देवाला प्रार्थना आहे, मला बळ दे!!!

काही प्रश्न आहेत, त्यावर नक्की आपणही सर्वांनी विचार करावा. 

१)१९९४ साली घडलेल्या घटना सत्य असोत वा असत्य, आज २७ वर्षानंतर त्या का आठवाव्यात?  

२) बाबांचा इतका द्वेष वाटत असेल तर त्यांचा राजकीय व आर्थिक व्यवहार विनय शिवतारेने २०१८ पर्यंत का सांभाळला? 

३) बाबांनी कमावलेली संपत्ती आजवर दोघांनी निमूटपणे नावे का करून घेतली?    

४)विनय शिवतारे व विनस शिवतारे यांनी स्वकर्त्वृत्वावर आजवर काय कमावल?    

५) वाद सर्व घरात असतात, म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली... पण मृत्युशय्येवर असलेल्या वडिलांसोबत असा व्यवहार कितीही वाईट असले तरी कोणी मुलगा करणे योग्य आहे का?


माझ्या मुलीने केलेले सर्व आराेप खोटे : मंदाकिनी शिवतारे  

शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी यांनी फेसबुकवर व्हिडिओ शेअर करुन मुलगी डॉ. ममता शिवदीप लांडे यांना उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझी मुलगी ममताने केलेले आरोप धादांत खोटे आहेत. गेल्या २७ वर्षांपासून शिवतारे हे कुटुंबापासून वेगळे राहत आहेत. संपत्ती हा वादाचा विषय नाही तर सुरू असलेला जाच आणि मानसिक छळातून मुक्तता करण्याचा हेतू आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies